Friday, October 2, 2009

गडबड-गोंधळ


आई म्हणते लाल तर बाबा म्हणतो निळा
आता मी बिचारीने कोणता फ्रॉक घालावा?
आदित्य म्हणतो क्रिकेट तर सुह्रद म्हणतो लपाछपी
आता मी काय खेळू म्हणता तुम्ही?
आत्या म्हणते सिनेमा तर आजी म्हणते नाटकाला जावं
आता मला सांगा मी यातलं काय बघावं?
खरं तर मला वाटतंय मी आत्ता काहीतरी खावं
पण यांना हे कुणी सांगावं?

Thursday, October 1, 2009

Cat and Rat

There is one rat
He likes to sleep on mat
One day he is playing with a bat
and there comes a pusy cat
Ran away the rat
but poor cat
it slipped and fell on mat
Turned around the rat
and now it is going to trouble the cat!

Thursday, September 3, 2009

त्या दिवशी मी खूप घाबरले...


माझा स्वभाव तसा भित्रा नाही. पण मी कधी घाबरतच नाही असेही नाही.
पण एकदा मात्र मी जाम घाबरले होते. याचे कारण हे की मिट्ट काळोख होता.
तुम्ही म्हणाल काळोख होता तर काय त्यात घाबरायची काय गोष्ट ? तो तर
कायमच असतो !
मी पण आता असेच म्हणते पण ३ रीत असताना मी अंधाराला फार घाबरायचे,
१०-११ नंतरच्या काळोखाला तर फारच! त्यादिवशी पण तसंच झालं होतं.
मला खूपच भीती वाटली होती. ऐका तर मग !
११-१२ ची वेळ होती. आईने मला सुहृदसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात
पाठवलं. मी पेला घेऊन पाणी भरत असताना माझं लक्ष स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलं.
बहुधा अमावस्या असावी कारण चंद्राचा प्रकाश मुळीच नव्हता. अचानक मला संध्याकाळी, ’मस्त आहे!’ म्हणून दोनदा वाचलेली शेरलॉक होम्स ची सोनेरी चष्म्याचे रहस्य गोष्ट आठवली.
एक बाई रात्रीच्या सुमारास विलबी नावाच्या एका तरुणाच्या पाठीत चाकू घालून त्याला मारते अशी काहीतरी गोष्ट होती. पण तिचा परिणाम असा झाला की मी खिडकीकडे पाठ केली व मला अचानक कोणीतरी त्या बाईसारखी खिडकीतून उडी मारल्याचा भास झाला. मी जाम घाबरले. पेला तसाच खालीच टाकून भीतीने थरथरत मी झोपायची खोली गाठून आईला मिठी मारली.


आता तो प्रसंग आठवला की मनमुराद हसते.
पण तेव्हापासून मी संध्याकाळच्या नंतर रहस्यकथा वाचत नाही.

Wednesday, September 2, 2009

चित्र

लाल रंगाची काढली शाल
पाहिली होती दुपारी काल
पिवळ्या रंगाचं परकर पोलकं
गळ्यात काढलं एक ढोलकं
हिरव्या रंगाची मुलगी छान जमली
अशा रंगाची मुलगी होती माझ्या मनावर बिंबली
काळ्या रंगाचे मग लांबसडक केस
ही तर होती अर्जंट केस
नंतर मुलगी इतकी छान दिसली
ती पाहून आई खुद्कन हसली
मी म्हणाले नाही का आवडला मुलीचा रंग?
तर आई म्हणाली छे बाई छान उधळले आहेस रंग!

अफजलखान

मी आणतो उचलला विडा
विजापूरहून निघाला सरदार बडा
खूप सैन्यानिशी आला चालून
त्याला वाटले शिवाजीला टाकले पाहिजे मारुन
खान होता सरदार वाईचा
त्याला माहित होता सर्व मुलुख वाईचा
महाराज तडक प्रतापगडावर गेले
खानाला वाटले महाराज घाबरले
खोटे सांगून महाराजांनी खानाला खेचून आणले
भेटीच्या दिवशी त्याला ठार केले
नंतर त्याचे प्रतापगडावर दफन करण्यात आले
स्वराज्याची प्रगती पाहून जिजाईला धन्य धन्य झाले

Wednesday, August 26, 2009

मी कोण ?

कधी मी असते झाड
कधी होऊन जाते माड
कधी असते सुंदर फूल
कधी होते कानातील डूल
कधी होते मोठ्या लाटा
कधी होते असंख्य वाटा
नंतर कधीतरी लक्षात येते
’मी माणूस आहे’ मी म्हणते...

Sunday, August 23, 2009

कर्ण

जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघाला
तेव्हा ऋषींच्या वेषात इंद्र कर्णाकडे निघाला
कर्णाकडे होती शक्तिशाली कुंडले
जेव्हा ती मागितली इंद्राने, सर्वांचे तेव्हा बोलणेच खुंटले.


पण कर्ण होता दानशूर स्वभावाचा
पाठवायचा नाही तो कुणाला रिकाम्या हाताचा
सूर्याने त्याला हे सांगितले होते आधी
कर्ण म्हणाला मी असं करत नाही कधी
कर्णाने कवचकुंडले अर्पण केली.
इंद्राची मुद्रा आनंदित झाली.


कर्णाचे जीवन संपले दुसर्‍याच दिवशी
कुंती मात्र रडत होती मूकपणे मनाशी

वीर अंगद

वीर अंगद

अंगद होता उभा पाय पुढे करून
सरदार सर्व उभे होते जरा मागे सरकून
ते पाहून आला रावणाला राग
घाबरून सरदारांनी केला आपल्या अब्रूचा त्याग

एक एक सरदार त्याचा हलवू लागला पाय
अंगदाचा पाय इतक्या लवकर हलेल काय ?
सर्वांनी श्वास रोखला, जेव्हा रावण उठला
अंगदाच्या जवळ जेव्हा येऊन पोचला

रावण खाली वाकल्यावर, अंगद त्याला म्हणाला
मुकाट्याने शरण ये हे सांगायला आलो आहे तुला
अंगदाने झट्कन हात मुकुटापाशी नेला
उचलला रावणाचा मुकुट आणि दूर फेकून दिला

हनुमानाने नंतर तो हवेतच झेलला
अखेर युद्‍धात रामच जिंकला

Friday, August 21, 2009

घर

सारे सारे बाहेर होते
कोणी नव्हते घरात
फ़क्त उभी एक मुलगी घराच्या दारात
ती गाणे गात होती सुरात
पण ते गाणे ऐकायला कोणी नव्हते घरात

Wednesday, July 22, 2009

आपला हॅरी


हा आपला हॅरी
त्याची काळजी.... डोन्ट वरी !
ही आहे त्याची मैत्रीण, हर्माइनी
ती आहे शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी
हा आहे रॉन, मित्र हॅरीचा
नाही असातसा लेचापेचा
ह्या आहेत प्रा. मॅक्गोनागल, हुशार व कडक
जराही चूक घडल्यास गुण वजा करतात तडक
हे आहेत प्रा. स्नेप, करतात हॅरीचा द्वेष
काळे चिकट केस, लांब काळा झगा असा त्यांचा वेष.
हा आहे मॅल्फॉय शत्रू हॅरीचा
काढ्यात हुशार असला तरी नाही काही कामाचा
हे आहेत डम्बलडोर, त्यांची आहे हॅरीवर माया
त्यांनी दिली हॅरीला पितृप्रेमाची छाया
हा आहे अर्धदानव हॅग्रिड, हॅरीचा लहानपणापासूनचा मित्र
त्याने पाळलं आहे तीन तोंडांचं कुत्रं
हा आहे सिरिअस ब्लॅक, हॅरीचा धर्मपिता
१३ वर्षांपर्यंत हॅरीला हा माहीत नव्हता

असा हा हॅरी माझ्या मनात शिरला
एक जिवाभावाचा, छान मित्र झाला...

Sunday, June 14, 2009

पाउस

रिमझीम पडतो
टपटप पडतो
हळू हळू पडतो
पाउस ॥१॥
टपटप पडतो
फ़ांदीवर रहातो
ओलं ओलं करतो
पाउस ॥२॥
रिमझीम पडतो
मातीवर पडतो
हिरवं हिरवं करतो
पाउस ॥३॥
हळू हळू पडतो
मन शुध्द करतो
आनंद देतो
पाउस ॥४॥
_ मुक्ता

सायकल

एक आहे दोस्त माझी
कविता आहे ही ताजी
तिचे नाव सायकल शाइन
म्हणाली तुझ्या बरोबर राहिन!
झाली मैत्रीण जिवाभावाची
नसेल अशी मैत्रीण जगात दुसर्‍या कोणाची!
मी मानते तिला बहीण
ती म्हणते तू माझी मालकिण
कळवळून म्हणाले नाही गं नाही
आपण दोघी मैत्रीणी की नाही?
चल आपण दोघी मारून येउ फ़ेरी
नंतर करू दोघी पोटभर न्याहारी
उद्या आंघोळ घालीन मी तुला
चाकात तुझ्या हवा भरायचीये मला
नंतर तुला देइन दिवस भर सुट्टी
होइल ना मं तुझी माझी गट्टी?

Thursday, June 11, 2009

माझं क्रिकेट

मी एकदा खेळत होते क्रिकेट.


त्यात मी काढली २ जणांची विकेट!


अवघड बॉलवर मारली सीक्स!


मी झाले मॅन ओफ़ दी मॅच फ़िक्स!


नंतर मारली मस्त फ़ोर


वाढत गेला टीमचा स्कोर!


मुलींची मी राखली शान


स्त्रियांची ही जात महान

आनंदाने खूप ह्सले

पलंगावर उठून बसले

Wednesday, June 10, 2009

खजिना

नाणी! नोटा! दगड! शंख! शिंपले! सोनं! चांदी! खडू! कागद! निसर्ग!

कितीतरी गोष्टी. पण माझा खजिना यापेक्षा वेगळा आहे. त्यातलीच एक गोष्ट

म्हणजे ......

माझे मित्र-मैत्रिणी!!!

मैत्री या गोष्टीमधे कधीही वय

नसतं, असतात ते संबंध! जोरदार भांडाभांडी करून सुध्दा पुन्हा एकत्र यायला

काय मजा असते! सॉलीड! अशी मजा तर आईस्क्रीम खायलापण येत

नाही!!!!!

दुसरी म्हणजे .......

पुस्तके!!!!!

पुस्तक म्हणजे काय असतं ?

हे फक्‍त पुस्तकातील चित्र आवडणार्‍यांना किंवा ती फक्‍त अभ्यासासाठीच

असतात असं वाटणार्‍यांना अजिबात कळणार नाही. फक्‍त पुस्तकामुळे

आपण सारं जग पाहू शकतो तेही एका जागेवर बसून !! जरा विचार करा

ही पुस्तकं लिहिणार्‍यांच्या काय अफलातून कल्पना असतील ?


बरं आता--

माझा तिसरा खजिना म्हणजे....

आरसा !!!

आरसा आपल्याला स्वतःला

दाखवतो. पण त्यात एक कमी आहे ती म्हणजे तो फक्‍‍त आपले प्रतिबिंब

आपल्याला दाखवतो, मनातले आपण आपल्याला कधीच दिसत नाही. ते आपण

फक्‍त मनातच असतो...

एक होता हॅरी

एक होता हॅरी
म्हणाला मला डोन्ट वरी !
एक होता हॅरी
म्हणाला मला दे सुरी!
एक होता हॅरी
म्हणाला तू खरी कामकरी!
एक होता हॅरी
म्हणाला मला
तू माझी मैत्रीण खरी!!!!!!!!!!

Tuesday, June 9, 2009

पत्ते


त्ता तर बासच झालं! आईला एकदा म्हणाले,पत्ते खेळ्तीयेस?
पण आई मात्र म्हणाली नाही!
छे!
शेवटी मी पत्त्यांमधले राजा,राणी,गोटू काढून खेळत
बसले!
माझा सर्वात आवडता डाव not at home या खेळाबद्दल
फ़ार वेळ चालतो हे ऎकायला लागणार्‍या डावांसारखाच तो!
जेव्हा आदित्यने मध्येच सांगीतले की मी खेळत नाही!
तेव्हा मी चीडले!
सर्वात भारी म्हणजे लंपन! त्याने आमच्या ओटयाखाली पत्ते
घुसवले!
काय माहीत त्या ओटयाखाली किती पत्ते असतील!