Sunday, June 14, 2009

पाउस

रिमझीम पडतो
टपटप पडतो
हळू हळू पडतो
पाउस ॥१॥
टपटप पडतो
फ़ांदीवर रहातो
ओलं ओलं करतो
पाउस ॥२॥
रिमझीम पडतो
मातीवर पडतो
हिरवं हिरवं करतो
पाउस ॥३॥
हळू हळू पडतो
मन शुध्द करतो
आनंद देतो
पाउस ॥४॥
_ मुक्ता

1 comment:

  1. तुझी "पाऊस" यंदाच्या जून मधली आहे हे बघितले नव्हते, sorry !


    तुझी "हळु वाल्या" पावसावरती आहे, आता पावसाचा जोर वाढल्यावर त्याचे एक नवीन रूप दिसेल, त्यावर सुचली तर ?

    ("हळूहळू पडतो/ मन शुद‍ध करतो/" वरुन शंकराच्या पिंडीवर कलशातून थेंब-थेंब पडणारे पाणी आठवले आणि मग डोळ्यातही पाणी आलेय...)

    --- विश्‍वासमामा

    ReplyDelete