Sunday, August 23, 2009

कर्ण

जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघाला
तेव्हा ऋषींच्या वेषात इंद्र कर्णाकडे निघाला
कर्णाकडे होती शक्तिशाली कुंडले
जेव्हा ती मागितली इंद्राने, सर्वांचे तेव्हा बोलणेच खुंटले.


पण कर्ण होता दानशूर स्वभावाचा
पाठवायचा नाही तो कुणाला रिकाम्या हाताचा
सूर्याने त्याला हे सांगितले होते आधी
कर्ण म्हणाला मी असं करत नाही कधी
कर्णाने कवचकुंडले अर्पण केली.
इंद्राची मुद्रा आनंदित झाली.


कर्णाचे जीवन संपले दुसर्‍याच दिवशी
कुंती मात्र रडत होती मूकपणे मनाशी

1 comment:

  1. ही कविता छान आहे.तुला कर्णावर कविता करावीशी का वाटली?
    एवढे मोठे शब्द कुठून सुचले? कर्णाबद्द्लचे पुस्तक वाचलेस का?
    _गौतमी.

    ReplyDelete