Wednesday, August 26, 2009

मी कोण ?

कधी मी असते झाड
कधी होऊन जाते माड
कधी असते सुंदर फूल
कधी होते कानातील डूल
कधी होते मोठ्या लाटा
कधी होते असंख्य वाटा
नंतर कधीतरी लक्षात येते
’मी माणूस आहे’ मी म्हणते...

1 comment:

  1. फारच छान! मला ही कविता खूपच आवडली.

    - आशा मावशी

    ReplyDelete