Wednesday, September 2, 2009

चित्र

लाल रंगाची काढली शाल
पाहिली होती दुपारी काल
पिवळ्या रंगाचं परकर पोलकं
गळ्यात काढलं एक ढोलकं
हिरव्या रंगाची मुलगी छान जमली
अशा रंगाची मुलगी होती माझ्या मनावर बिंबली
काळ्या रंगाचे मग लांबसडक केस
ही तर होती अर्जंट केस
नंतर मुलगी इतकी छान दिसली
ती पाहून आई खुद्कन हसली
मी म्हणाले नाही का आवडला मुलीचा रंग?
तर आई म्हणाली छे बाई छान उधळले आहेस रंग!

1 comment:

  1. मला आवडला तुझ्या कवितेचा ढंग !

    -आशा मावशी

    ReplyDelete