Thursday, January 27, 2011

काळा पोपट

एक हिरवा पोपट होता. त्याने आपला रंग काळा करून घेतला पण चोच मात्र लालच ठेवली. हा काळा पोपट सारखा आमच्या गच्चीत यायचा.
एकदा तो ’टक टक’ करून दारातून आला. आम्ही त्याला कॉफी पाजली. नंतर पर्स गळ्यात अडकवून तो दारातून पायर्‍या उतरून गेला.
जाताना सोबत सुहृदला आणि शेळीला, दोघांना घरी घेऊन गेला. आणि त्याच्या पर्समधे काय होतं? ते हिवाळ्याचे दिवस होते तरी त्याच्या पर्समधे होते आंबे.
घरी गेल्यावर त्याने आंब्याचा रस केला. सुहृदला आणि शेळीला खाऊ घातला.


--- सुहृद

4 comments:

  1. लई भारी गोष्ट!
    आत्या
    ही गोष्ट एखाद्या समीक्षकांपुढे टाका.ते काळा पोपट,पर्स,हिवाळ्यातही आंबे यातील
    लपलेला अर्थ उलगडतील

    ReplyDelete
  2. छानच आहे गोष्ट..
    सुहृद पुढे समांतर सिनेमा काढणार असं दिसतय :-)

    ReplyDelete