Friday, January 14, 2011

चंद्र गोष्ट

एक होता मुलगा. तो बाबांना म्हणाला,” मला चंद्र द्या ना.” त्याच्या बाबांनी लांबलचक शिडी आणली आणि डोंगराला लावली. ती चंद्रापर्यन्त गेली. बाबा शिडीवर चढ्त चढत वर गेले. खालती कुणाचा आवाज आहे ते पाहिलं. त्यांचा मुलगा म्हणत होता, ” अरे, आकाशात खेळायला गेले बाबा.” बाबा चंद्राजवळ पोचले. चंद्र तर भलामोठ्ठा होता. बाबांना आणता येईना. मग चंद्र छोटा छोटा होत गेला. छोटा झाल्यावर बाबा चंद्र घेऊन खाली आले. मुलाला चंद्र दिला. चंद्र छोटा छोटा व्हायला लागला. पटकन मुलाच्या पोटातच गेला. मुलगा ऍ ओ ऍ ओरडायला लागला. मग चंद्राची कोर पोटातून बाहेर आली. आकाशात गेली. आकाशात गेल्यावर मोठी मोठी मोठी मोठी व्हायला लागली. मग तो भलामोठ्ठा नेहमीचा चंद्र झाला.

-----सुहृद

10 comments:

  1. भारी!छॊट्या छोट्या सुहृदची मोठ्ठी मोठ्ठी कल्पनाभरारी!

    - सचिन

    ReplyDelete
  2. व्वा! भारीच.तुझ्या एवढी मी असताना मला अशी गोष्टच जमली नाही.

    ReplyDelete
  3. भारी सुरुद्ध!

    ReplyDelete
  4. छान!आता थोड्या दिवसांनी स्वत:चा ब्लॉग काढशील!
    -नीरजा

    ReplyDelete
  5. सुहृद फारच छान गोष्ट आहे रे तुझी!!!!!!!!

    ReplyDelete
  6. सुह्रद,शाब्बास!
    आता तू त्यादिवशी सांगितलेली ’कावळा आणि मासोळीची ही गोष्ट टाक.
    आत्या

    ReplyDelete
  7. सुहृद तुझे छान छान लेखन आता वाढतेच आहे. थोड्याच दिवसात ब्लॉगच्या लिस्टमध्ये तुझेही नाव येईल बहुतेक!!
    मस्त! असंच लिहीत रहा.(म्हणजे सांगत रहा.)
    - गौतमी

    ReplyDelete
  8. mast !
    chandrala suddha hi gosht naveench asel.

    Bhagyashri Atya

    ReplyDelete