Monday, February 7, 2011

पक्ष्यांची गोष्ट

सकाळी मी शाळेत जातो ना? तेंव्हा माझ्या डब्यात कावळे, चिमणी, पोपट जावून बसतात. शाळेत मी डबा उघडला ना, की पटापट बाहेर येतात. माझ्या तोंडात जातात. तिथे एक मंत्र म्हणतात आणि माझ्या पोटात जातात. माझ्या पोटात काव काव, चिऊ चिऊ, मिठू मिठू ओरडायला लागतात. मी ऍ ओ ऍ ओरडलो की ते उडत उड्त बाहेर येतात. ड्ब्यात जावून बसतात.
मला खाऊ आणून देतात. भाजलेला ब्रेड, कधी कधी ना, साबुदाण्याची उसळ आणून देतात.कधी कधी ना, तीन लाडू आणून देतात. ताई आल्या तर ताईंना वाटेल लाडूचेच जेवण! कधी कधी अख्खा पेरू आणून देतात मी पेरूचा छोटा तुकडा खातो, तो माझ्या तोंडामधे गमतीजमती करीत राहतो. हो गमतीजमती करीत राहतो, हो गमतीजमती करीत राहतो.
माझ्या डब्यातली भाजी-पोळी कावळे, चिमण्या, पोपट खाऊन टाकतात.
मला खंजिरी वाजायच्या आधीच झोप येते. येता येता मी झोपतो. घरी येऊन मी झोपतो.

--सुहृद

6 comments:

  1. ही तर थेट लंपनचीच गोष्ट! तंतोतंत!

    ReplyDelete
  2. अरे वा तुझ्या पोटात बरेच पक्षी वस्तीला आहेत की!
    काय मुक्ता मॅडम, ब्लॉगवर तुमची एंट्री नाही बरेच दिवसात! जरा मनावर घ्या.
    आत्या

    ReplyDelete
  3. मज्जा आली वाचायला... लाडू तीन का पण !

    ReplyDelete
  4. अरे व्वा! आम्ही पण ’वदनी कवल घेता’ मंत्र म्हणतो आणि आमच्या पोटात कोंबडी लपायला जाते.
    - सचिन

    ReplyDelete
  5. अप्रतिम!
    आदित्य

    ReplyDelete