Thursday, March 4, 2010

नात्यातील गुंफण

नाती वेगवेगळ्या प्रकारची असतात. आपल्या आजूबाजूलाखूप नाती दिसतात. आपण स्वताःही ती अनुभवतो. मैत्रीचं नातं तर सर्वांचचं असतं. प्रत्येकाला कोणीतरी जिवाभावाचा दोस्त असतो. परवा पेपरमधे कुणाचा तरी प्रसंग आला होता. त्या माणसाला कुणीतरी ऎनवेळी पैंशांची मदत केली होती. ते होतं माणूसकीचं नातं. माझं नि माझ्या आईचं जिवाभावाचं नातं आहे. एके दिवशी मला तिचा राग आला म्हणून मी तिला रिक्षात बसल्यावर टाटा केला नाही. रिक्षा सुरू झाली मलाच खूप वाईट वाटले आणि मी हात हलवून टा टा केला. माझं नि सुहृदचं अतूट नातं आहे. आम्ही कायम एकमेकांना मारतो, कट्टी घेतो पण शेवटी एकमेकांना मिठी मारतो. माझं नि बाबाचं रक्ताचं नातं आहे, मी अगदी त्याच्यासारखीच आहे. आम्ही दोघेही आई जोरात ओरडून धमकी देई पर्यन्त वाचत बसतो. प्रत्येकाशी माझं नातं, मी जन्मल्यापासून जोडलेलं आहे. ही एक विविध नात्यांची गुंफण माझ्याभोवती आहे आणि असणार आहे.

3 comments:

  1. नात्यांची गुंफण एकदम छान.

    ReplyDelete
  2. मुक्ता ,
    छान तू लिहीतेसच पण हा अगदी छोट्टासा झाला. नात्यांचे आणखी अनुभव तुला आले असतीलच...त्यातले काही खास असले तर यात नक्की भर घाल.

    ReplyDelete
  3. tuzya aani pustakanchya natyacha kay?

    ReplyDelete