Friday, February 26, 2010

विदूषकी चाळे

बाबा कायम त्याची पॅंट काढून आमच्या बंकबेडच्या शिडीवर ठेवतो. त्या दिवशी देखील मला त्याची पॅंट दिसली. मला काय वाटले कुणास ठाउक! पण मी ती पॅंट घातली. खरं तर घातली पेक्षा चढवली म्हणणे योग्य ठरेल. मी ती घालताना ती दहावेळा तरी घसरली असेल !!! मग मी पॅंट खाली घसरू
नये म्हणून ती एका हातात धरून दुसर्‍या हाताने आईचा पट्टा शोधून काढला आणि कसाबसा त्या पॅंटला आधार दिला. पॅंट घसरायची थांबली. मला कोपर्‍यात बाबाचा शर्ट दिसला. मी तो शर्ट घातला. तो शर्ट मला पंजाबी-ड्रेसच्या टॉप एवढा होत होता! मग मी माझी टोपी शोधून काढली आणि ती डोक्यावर जरा तिरकी करून ठेवली. मी आरश्यासमोर जाउन जरा चेहर्‍याला रूज लावलं. नाकावर देखील रूजचा एक ठिपका दिला. पावडर शोधत असताना मला आईचे टिकलीचे पाकिट मिळाले. मग मी दोन्ही भुवयांवर त्या लावल्या, काजळ तर अगदी पाणी येइपर्यंत डोळ्यात घातले. सगळ्या मेकअप झाल्यावर मी आरशात स्वतःला न्याहाळले. मी छान दिसत होते. मजेशीर छान! मी जरा विदूषकासारखे इकडून तिकडे पळून पाहिले. काही फार अवघड नव्हतं पण फार सोपं होतं असं मुळीच नव्हतं! मुख्य म्हणजे बाबाची पॅंट ! ती दर वेळी घसरत घोट्यापर्यंत येइ आणि मग मला ती वर घ्यावी लागे!
थोडी कसरत केल्यावर मी आई जवळ गेले. तिने थोडावेळ माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली "मुक्ता कपडे काढून ठेव, टिकल्या किती वाया घालवल्यास. छे!" मी सगळ्या टिकल्या काढल्या, कपडे कपाटात ठेवताना मला वाटलं जर वेळ आली तर मी देखील एक उत्तम विदूषक होउ शकेन!!

6 comments:

  1. photo ka nahi kadhun thevlas. bhari disat asashil
    -vaishali

    ReplyDelete
  2. आत्ता कळलं की ती पॅंट मला आता लहान का व्हायला लागली ते !

    ReplyDelete
  3. काय गं,उगीच विदूशःकी चाळे कशाला करतेस?(म्हणा नेहमीच करतेस!)

    ReplyDelete
  4. मिलिन्द्चं मेल आलयं त्याची एक पॅंन्ट सापडत नाहीये म्हणून! तुझा कप्पा अजून धुंडाळला नाही वाटतं त्याने!
    - सचिन

    ReplyDelete