Saturday, March 6, 2010

शटल

आमच्या बॅडमिंटनच्या क्लासमधे बाहेरच्या मोकळ्या जागेत मी, आस्था आणि उमा टॉस करत होतो. छान संध्याकाळ होती, अधून मधून उन डोकावत होतं. खाली खडीमुळे जरा हललो कि आवाज येत होता. आदित्य आत गेम खेळत होता त्यामुळे मी आस्था, उमा सोबत खेळत होते. शटल उमाकडे गेल्यावर उमा जोरात ओरडली "हा माझा बेस्ट शॉट!" आणि तिने शटल उडवले, ते थेट जाउन बॅडमिंटन कोर्टच्या इमारतीच्या जरा पुढे आलेल्या छतावर पडलं! आस्था लगेच ओरडली माझं नवं कोरं शटल घालवलस उमा, तू ! आम्ही लगेच आत जाउन मोठी काठी आणली. आम्हा तिघीत मी सर्वात उंच! त्यामुळे मी हातात ती अवजड काठी धरून उभी राहिले. शटल काढण्यातील सर्वात कटकटीची गोष्ट म्हणजे आपण शटल काढतो तिथून ते अजिबात दिसत नाही आणि शटल दिसावं म्हणून मागे गेलो तर काठी पोचत नाही!
आत मुलं वॉल प्रॅक्टीस करताना टयूब लाइट मधे जाउन अडकतं पण ते सहजपणे काढता येत असल्याने कुणी फारसं मनावर घेत नाही. मीही बर्‍याचवेळा शटल टयूब लाइट मधे पाठवलं आहे! पण बाहेर मात्र झाडावर / छतावर शटल अडकलं कि मुलं मनावर घेतात.
मी बर्‍याच वेळा काठी इकडून तिकडे फिरवली पण शटल काही मिळेना. मागून आस्था व उमा बेंबीच्या देठापासून ओरडत होत्या " अगं थोडं राइटला घे " ( क्लासमधील बहुतेक मुली इंग्रजी माध्यमाच्या आहेत.) मी "राइट"ला काठी नेली कि लगेच " अगं लेफ्टला घे!" असं चालू होतं! मी थोडावेळ थांबायचं सुचवलं तर उमा लगेच म्हणाली "मी आतून खुर्ची आणते" मी हताश होउन पाहू लागले. एव्हाना ती अवजड काठी पकडून चवडयावर उभ राहिल्याने पाठ ठणकत होती पण खुर्ची आणून काही उपयोग झाला नाही. तेव्हड्यात ताईंनी मला गेम खेळायला बोलावले. मी निराश आस्था व उमाकडे पाठ करून , रॅकेट घेत पळाले.

घरी जाताना मी शटल आहे का ते बघीतलं, तर ते तिथं होतं! त्याला आता कोणीच तिथून कढणार नव्हतं. ते तिथंच पडून रहाणार होतं, कायम......

4 comments:

  1. वा !

    शटल तिथे पडून राहणार आणि त्याची आठवण येथे...

    ReplyDelete
  2. छान!
    त्या 'तिथेच पडून राहिलेल्या शटलची' कहाणीही लिही ना!

    ReplyDelete
  3. मुक्ता फारच छान लिहीलं आहेस. मला वाटत तू आणि आईने ठरवलं आहेस का जोरदार लिखाण करायचं. नुसते ब्लॉग वर ब्लॉग. त्यामुळे आम्हाला छान छान वाचायला मिळतय. keep it up.

    ReplyDelete
  4. छान!
    शटल काढण्यातली कटकटीची गोष्ट मला खूप आवडली.

    ReplyDelete