Saturday, March 27, 2010

जिवाची मुंबई!

पाडव्याचा दिवस. आम्ही पहाटे उठून आमच्या बसची वाट पहात होतो. बस आल्यावर आम्ही आत चढलो. रस्त्यावर शेकडो गुढया आम्ही पाहिल्या. बसमधे "थ्रि ईडियट्स" सिनेमा लावल्यामुळे मी त्या कंडक्टरवर खूष होते. बांद्रा आल्यावर मी कुरकुरत उठले. कारण "थ्रि ईडियट्स" अर्धवट राहिला होता! आम्ही नंतर राजीव गांधी पुलावरून "नेहरू प्लॅनेटोरियम" ला पोचलो. आम्हाला १२ चा शो मिळाला.
तो नेमका हिंदीत होता! अर्थात हे मला शो सुरू झाल्यावर कळलं! आम्ही आत गेलो. तिथे छान ए.सी. होता. तिथे एव्हडया उन्हातून प्रवास केल्यावर झोप येणं सहाजिकच होतं. पण संपूर्ण शो पहायचा या जिद्दीने डोळे सताड उघडले. बाबा तिथे निम्मावेळ झोपूनच होता हे मला नंतर कळले! तिथे रेलायची खास सोय आहे. आपण टेकलो की त्या खुर्च्या मागे जातात. त्यातल्या काही हिंदी शब्दांना मंडळी ठरवल्या सारखी हसायची.उदा. निहारीका. निहारीका या शब्दानंतर हास्याचा धबधबा कोसळे.
नेहरू प्लॅनेटोरियम झाल्यावर पुढे म्हणजे राणीची बाग. आत जाताना सरबताच्या बाटल्या काढून घेउन त्या एका कपाटात ठेवण्याचे काम काही माणसे करत होती. आमची स्लाइस सरबताची बाटलीही त्या कपाटात सुखरूप पोचल्यावर आम्हाला आत प्रवेश मिळाला. तिथे निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तिथे झाडांमुळे बर्‍यापैकी सावली आहे . एकूण बाग छान आहे. सुहुदला आवडली.
राणीची बाग झाल्यावर आम्ही एका प्रसिद्ध पाणी-पुरीच्या दुकानात गेलो. पण ते बंद होतं म्हणून मॅक्डोनाल्डसमधे गेलो. तिथे खाउन झाल्यावर आम्ही "गेट वे ऑफ इंडिया" ला गेलो.
तिथे गेल्यावर एका बोटीत बसून फिरायला निघालो. आम्हाला वाटेवर कित्येक परदेशी दिसले. ते सर्वजण कुठेतरी जात होते. ते कुठे जातायत म्हणून वळून पाहिलं, तर ताज हॉटेल! ते बर्‍यापैकी सुस्थितीत होतं. पट्कन कुठे आग लागली होती ते कळत नव्हतं. मी बोटीत बसल्यावर मला छान वाटू लागलं. कारण आता आम्ही समुद्र सफरीला निघणार होतो. एक झटका बसला. आणि बोट लाटांचा सामना करत पुढे निघाली. खूप मनोहर दृश्य होतं. बोटीशेजारी भरपूर फेस तयार झाला होता. मला लाटांबरोबर एक जॅकेट आणि एक लाकूड जाताना दिसलं. तेव्हड्यात आमच्यासमोरून एक बोट गेली. आम्ही वळून परत जायला निघालो.परत जाताना काही छोट्या पण टुमदार बोटी दिसल्या तसं मी बाबाला त्यांच्याबद्दल विचालं. तो म्हणाला की बरेच श्रीमंत लोक अशा बोटी विकत घेतात आणि मित्रांबरोबर फिरायला वापरतात. तिथे जवळपास १०० तरी बोटी असाव्यात याचा अर्थ झाला की बहुतेक श्रीमंतांना समुद्राची आवड आहे! आम्ही बोटीतून उतरलो आणि दख्खनची राणी पकडायला निघालो. जाताना मी हट्ट करून ताज हॉटेल जवळून पाहून परतले.
स्टेशन खूप छान आहे. पण ते नीट पहायला वेळ नसल्याने मी हिरमुसून बाबामागे जाउ लागले. आमचं ए.सी.चं बुकिंग होतं. आत छान वाटत होतं. आमचा डबा स्वयंपाकघरापाशी होता. त्यामुळे खाण्याचे पदार्थ लवकर मिळाले. पुणे येईपर्यंत माझं पोट भरलं होतं. पुणे आल्यावर आम्ही उतरलो. घरी पोचल्यावर दाराशी मी सकाळी काढलेली गुढीची रांगोळी दिसली. ती पाहून मी हसले, चला उदयापासून शाळा सुरू! ही जिवाची मुंबई एकदिवस पुरे झाली!

10 comments:

  1. मुक्‍ता,

    खूप छान.
    मधूनमधून मिस्किल, थोडेसे तिरकस शेरे,शेवटी गंभीर !
    काय प्रतिक्रिया लिहावी असा प्रश्न पडला आहे.
    आम्हाला एक धडा होता ’तू तर माझ्याही पुढे गेलीस’ या शीर्षकाचा.
    ’जिवाची मुंबई’ वाचल्यावर पहिल्यांदा मनात आले ते ’तू तर आत्ताच माझ्याही पुढे गेलीस’.

    ReplyDelete
  2. मुक्‍ता,

    मस्तsssच!!
    तुम्ही जीवाची मुंबई कशी केली, ह्याचे रसाळ वर्णन वाचून त्याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहिले.
    बरं, त्या स्लाइस सरबताच्या बाटलीचे पुढे काय झाले? मिळाली का परत? :)

    ReplyDelete
  3. आम्ही नाही आणली! त्या बाट्लीतलं सरबत आम्ही घरून आणलेल्या बाट्लीत भरलं .ते घरच्या बाटल्या आत नेउ देत होते.

    ReplyDelete
  4. लई भारी मुक्ता....
    मी नकळत फिरून आले मुंबईला ,तुझं बोट धरून आणि तुझ्या वयाची होऊन...!
    खूप छान

    ReplyDelete
  5. khare sangayche mhanaje ya muktache mansik ani baudhik vay kiti aahe asa mala prashna padala aahe.Koni yache uttar deil ka?

    ReplyDelete
  6. छान!
    बहुतेक श्रीमंतांना समुद्राची आवड आहे! हे मला नवीनच कळलं.(आणि आवडलं)
    ही माहिती मला तेंव्हाच का नाही दिलीस?

    ReplyDelete
  7. मुक्ता वाचून झाल्यावर मी पार दमून गेले. बापरे केवढा मोठा हा दौरा. आणि तो सुध्दा एका दिवसात, परत सकाळी छान रांगोळी काढून वगैरे करुन. great.

    ReplyDelete
  8. Maja aali vachun. Jiwachi mumbai jar firanyasathi asel tar mag konala nahi awadnaar.

    ReplyDelete
  9. 1 number lihila aahes !

    ReplyDelete