Saturday, July 27, 2013

दोन गोष्टी


स्वप्नं

पुस्तकाला पाय आले तर ते शाळेत गेलं. 
डब्यात त्याला गोष्टी दिल्या. ते दप्तराच्या बाहेर बसलं.
त्याला सगळे वाचायचे, हसायचे.
एकदा काय झालं?
कोणीच वाचलं नाही त्या पुस्तकाला!
मग काय झालं?
त्याचे हातपायच गेले.
त्याबरोबर मला जाग आली.

.......

वस्तू  आणि फळं

माणसं पुस्तकात गोष्टी लिहीतात.
माणसं पुस्तक बनवतात
आणि माणसंच वाचतात.

माणसं सीडी बनवतात.
माणसंच सीडी लावतात.
माणसंच सीडी पाहतात.

माणसंच आम्रखंड बनवतात.
माणसंच आम्रखंड खातात.

पण माणसं आंबा नाही बनवू शकत.
आंबा स्वत:च स्वत:ला बनवतो.
फक्त फळं स्वत:च स्वत:ला बनवू शकतात.

- सुह्रद

7 comments:

  1. सुहृद,
    दोन्ही कविता एकदम मस्त.आणि दुसर्‍या कवितेतील शेवटच्या तीन ओळी तर फारच मस्त!
    तुज़े खूप खूप अभिनंदन!
    --आत्या,आजी,आजोबा

    ReplyDelete
  2. एकदम वेगळंच.. मस्त

    ReplyDelete
  3. सुह्रद भारी स्वप्न आहे. आवडल मला.

    ReplyDelete
  4. >>पुस्तकाला डब्यात 'गोष्टी' दिल्या
    भारीच!
    दोन्ही कविता मस्त!

    ReplyDelete
  5. सुहृद,
    मला तुझ्या गोष्टी खूप आवडल्या.
    >> माणसं आंबा नाही बनवू शकत.
    काय शोधून काढलं आहेस!
    मस्तच!

    ReplyDelete
  6. सुहृद,
    दोन्ही गोष्टी खुप आवडल्या.
    माणसं आंबा नाही बनवू शकत; पण माणसं आंबा लावू शकतात, हो की नाही? आपण लावली नां रविवारी जंगलात?

    - सचिन

    ReplyDelete
  7. > डब्यात त्याला गोष्टी दिल्या
    वा! डब्यात पुस्तकाच्या आवडीचा खाऊ. पुस्तक खुश झालं असेल.

    आंब्याची गोष्ट पण मस्त! आंब्याची कंपनी खायला/ पहायला तू कधी येणार?

    ReplyDelete