Wednesday, June 5, 2013

विषम पायांचा बेडूक

एक सात पायांचा बेडूक होता. म्हणून तो विषम पायांनी उड्या मारायचा. पण तो सात लोकांची शिकार करायचा तर एका कुत्र्याने त्याला पकडलं, खाऊन टाकलं. पण एक मांजर कुत्र्याला पकडायला आली , मांजरीने कुत्र्याला पकडलं मग बेडूक कुत्र्याच्या पोटातून बाहेर आला. मग त्याने रोज सात माणसांची शिकार केली मग कुठलाही माणूस राहिला नाही. मग कुत्रा मांजरीपेक्षा मोठा झाला मग कुत्र्याने बेडकाला खाल्लं, कुत्र्याने खाल्ल्यामुळे बेडकाचे पाय तुटले, बेडूक मरून गेला.  कुत्र्याने मांजरीला पकडलं , खाऊन टाकलं मग मांजर गेली मरून. कुत्र्याने स्वत:वर विश्वास बसवला. कुत्र्याने सगळ्या माणसांना सांगितलं, तुम्हांला त्रास देणारांना मी खाल्लंय, मग सगळी माणसं जिवंत झाली.
 मग सगळे सम पायांचे प्राणी आले.

-- सुहृद

12 comments:

  1. >> कुत्र्याने स्वत:वर विश्वास बसवला.
    एकदम मस्त, सुहृद!

    - सचिन

    ReplyDelete

  2. धन्यवाद! मला मस्त म्हटलंस म्हणून...!

    - सुहृद

    ReplyDelete
  3. मस्त - सुहृद. विषम पाय, सम पाय आयडिया एकदम भारी.

    ReplyDelete
  4. असं होय! असे झाले होय सगळे प्राणी सम पायांचे. आम्हाला सर्वांना फार आवडली ही तुझी गोष्ट.
    त्याबद्दल तुला खूप खूप शाबासकी
    आजी,आजोबा,आत्या.

    ReplyDelete
  5. सुहृद,
    मस्त! गोष्टीत गणित असलं की मला खूप आवडतं.
    आणि आपण आता सहलीला जाणार आहोत ना, तर वाटेत गाडीत "एsSS, अमुक अमुक संख्या राहिलीच की" चा खेळ खेळूया. आठवण कर हं.

    ReplyDelete
    Replies
    1. तू सांगितल्यामुळे मी आठवण करीन.

      -- सुहृद

      Delete
  6. सुहृद,
    गोष्ट आवडली.
    शाब्बास!

    -- आई

    ReplyDelete
  7. सम-विषम पायांची गोष्ट एकदम छान हं सुहृद !! आणखी लिही..

    ReplyDelete
  8. मुक्ता आणि सुऱ्हूद ,

    मी तुमचा ब्लॉग वाचतोय हल्ली… काय सॉलिड विचार करता रे तुम्ही मुले . खूपच छान .
    एक आवर्जुन सांगतो की माझी मुलगी - शाम्भवी आता अक्षरनंदन मध्ये आहे -छोट्या गटात !
    तिलाही आम्ही तुमच्या कविता वाचून दाखवतो . खूप खूप शुभेच्छा . मी आता या ब्लॉग चा follower आहे :-)

    -नितीन

    ReplyDelete