Wednesday, January 30, 2013

मला काय करायला आवडतं? आणि काय करायला आवडत नाही?


मला मोठं व्हायला आवडत नाही. मला अभ्यास करायला आवडत नाही. मला "मिलियन डॉलर कॅट सीडी" पाहायला आवडते. मला झोपायला आवडतं. मला पाणी प्यायला आवडतं. मला द्राक्षं खायला आवडतात. मला उठायला आवडत नाही. मला संगमनेरला जायला आवडतं. पण मी जन्मलो होतो तेव्हा मला संगमनेरला जायला आवडायचं नाही. मला कर्‍हाडला जायला आवडत नाही. मला रॅपिडमधे चक्कर मारायला आवडते. मला "प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी" गाणं ऎकायला आवडतं. कालचा दिवस करता येत नाही, हे मला आवडत नाही. जादू करता येत नाही हे मला आवडत नाही. ऍक्सेस गाडीवर मागे आईला धरून बसायला मला आवडतं. मला यशचं मोठी शाळा पुस्तक आवडतं. मला चित्र पाहायला आवडतात. मला पुस्तक वाचायला आवडत नाही. मला ओठांना क्रीम लावायला आवडतं. हॉटेलमधे जायला मला आवडतं. मला आईसक्रीम खायला आवडतं.


 -- सुहृद

7 comments:

  1. सुहृद,
    मस्त!
    काय काय छान लिहिलं आहेस रे!
    मला ना काय आवडतं सांगू?
    सुहृदशी गप्पा मारायला!

    ReplyDelete
  2. सुहृद, खासच!
    आणि कालचा दिवस करता येत नसला, तरी तसं करून द्यायला नीरजकाका आणि सचिनकाका आहेत, हे तुला आवडतं ना!

    ReplyDelete
  3. आम्हाला सुह्र्द खूप आवडतो.
    --आजोबा आजी आत्या

    ReplyDelete
  4. >>कालचा दिवस करता येत नाही, हे मला आवडत नाही.
    सुहृद,
    पण त्याचबरोबर उद्याचा दिवस करता येतो हे मला खूप आवडते. ही जादूच आहे नं? रात्री मी झोपतो तेव्हा अंधार असतो. पण सकाळी उठतो तेव्हा कोणी तरी जादू करावी तसा सूर्य भेटायला आलेला असतो आणि सगळीकडे उद्याचा प्रकाश पसरतो. मस्त नां?

    आणि हो, मला सुहृदबरोबर ’टॉम ऍंड जेरी’ बघायला खूप आवडतं; मज्जा येते.

    - सचिन

    ReplyDelete
  5. सुहृद,

    छानच!

    मलापण तुझ्याशी गप्पा मारायला आवडतात आणि तू म्हणतोस ती गाणी ऐकायला तर खूपखूप आवडतं !!

    ReplyDelete
  6. मस्तच लिहिलं आहेस! मला तू लिहितोस ते सगळं खूप आवडतं :)

    ReplyDelete
  7. सुहृद, तू जे लिहीतोस ते मला खूप आवडतं, तू खूप खूप दिवस काहीच लिहीत नाहीस ते फक्त मला आवडत नाही :)

    ReplyDelete