Sunday, March 2, 2014

चूक व बरोबरचा पाढा



चूक एके चूक
चूक दुणे टी.व्ही. उघडा
चूक त्रिक वॉशिंग मशीन तोडा
चूक चोक देवाला चिडवा
चूक पंचे झाड कापा
चूक सख घाबरवा
चूक साते कोणी घाबरलं तर हसा
चूक आठे त्रास द्या
चूक नवे ढकला
चूक दाहे कोणाला त्रास झाला तर हसा

---------------------

बरोबर एके बरोबर
बरोबर दुणे मदत करा
बरोबर त्रिक गंमत करा
बरोबर चोक देवासमोर हात जोडा
बरोबर पंचे लाईट गेले तर बॅटरी लावा
बरोबर सख विचार करा
बरोबर साते हातात घड्याळ घाला
बरोबर आठे पुस्तक वाचा
बरोबर नवे आळस सोडा
बरोबर दाहे चांगलं वागा

- सुहृद

6 comments:

  1. :)
    शाब्बास एके शाब्बासच!

    ReplyDelete
  2. सुहृद,
    तुझे सगळे पाढे ’बरोबर एके बरोबर’ !

    - सचिन

    ReplyDelete
  3. व्वा सुहृद. पाढे मस्त.

    ReplyDelete
  4. सुहृद,
    एकदम मस्त!

    ReplyDelete
  5. सुहृद,
    कविता एकदम मस्त. सुहृद एके सुहृदचा पाढा आमच्या आवडीचा आहे!

    --आत्या,आजी,आजोबा

    ReplyDelete
  6. >>चूक साते कोणी घाबरलं तर हसा
    बरोबर दुणे मदत करा
    बरोबर आठे पुस्तक वाचा
    बरोबर नवे आळस सोडा

    सुहृद, खासच!!

    ReplyDelete