Saturday, June 16, 2012

मी समुद्रात बुडलो आणि बाहेर आलो.

मी झोपलो. की पलंगावर झोपलो. मी समुद्रात बुडायचो. मला शार्क मासा दिसायचा शार्क माशाने डोकं बाहेर काढलं. आणि मला समुद्रात घेतलं आणि खाऊन टाकलं. परत मी त्याच्य तोंडातून बाहेर आलो. परत मी कधीही समुद्रात गेलो नाही. मला समुद्राची भीती वाटते. -- सुहृद

10 comments:

  1. मस्त लिहिले आहेस.मला त्यातील " परत मी त्याच्या (माशाच्या) तॊंडातून बाहेर आलो " हे वाक्य आवडले.कारण तू काहीही करू शकशील.तू एक शूर वीर मुलगा आहेस ना! समुद्राला तू काय घाबरतोस? तोच तुला घाबरेल.अरे बापरे! सुह्रुद?? मी घाबरलो ना? असं म्हणत असेल मनातल्या मनात समुद्र.

    ReplyDelete
    Replies
    1. समुद्र घाबरल्याचं मला आवडलं.

      -- सुहृद

      Delete
  2. सुह्रुद कल्पना भारी आहे. मला तर एकदम निमो मासा आणि त्याचा बाबाचीच आठवण झाली.
    "त्याच्या तॊंडातून बाहेर आलॊ" एकदम शूर मुलासारखा हो किनी. मग काय समुद्राला घाबरायचे काय कारणच नाही.

    ReplyDelete
  3. अरे सुहृद, भ्यायचं कशाला? आपण एक काम करू या. आता आपण समूद्रात मस्त पोहू यात आणि शार्कला पलंगावर झोपायला लावू यात.

    - सचिन

    ReplyDelete
    Replies
    1. वा! मला खूप हसू आलं.

      -- सुहृद

      Delete
  4. सुहृद, तू शार्क मासाच्या तोंडातून परत बाहेर आलास हे मस्तच! तुला ‘निमो’ दिसला का रे? त्याचं तर समुद्रातच घर आहे ना ! कित्ती छान!

    ReplyDelete
  5. मस्त!

    मला पण समुद्राची भीती वाटते. म्हणून मी पुन्हा पुन्हा समुद्रात जातो. खूप वेळा त्याला भेटून मग माझी त्याची मैत्री होईल. मग माझी भीती जाईल.

    ReplyDelete