Tuesday, February 14, 2012

सुहृदच्या कविता

भूत असं कोणी नसतं
भूत असं कोणी नसतं
मग कशाला ओरडायचं?
हात कशाला धरायचे?
खरं सांगू का?
स्वप्नात वाटू शकतं!

.......

टेडी बिअरला
एक स्वप्न पडलं
बाथरूममधे त्याला
एक भूत दिसलं
इतका घाबरला
इतका घाबरला
बेसीनमधे नळ सुरू झाला
आई, पळत पळत ये.
सकाळी उठलाSS
त्याला कळलेSS
आले नाही भूत
आई आहे घरी
नाहीये भूत.
भूत नसतं नसतं नसतं
भूत असतं असतं असतं.

-- सुहृद

12 comments:

  1. मस्त सुहृद! मला पण बाथरूममध्ये भूत दिसतं; म्हणून मी आंघेळीला जातच नाही! आहे की नाही गम्मत! पण हे कुणाला सांगू नकोस बरं का!

    - सचिन

    ReplyDelete
    Replies
    1. खरं की स्वप्नात?

      Delete
    2. धन्यवाद!

      -- सुहृद

      Delete
    3. अरे, स्वप्नात मी भूताशी फायटिंग करतो आणि आंघोळ पण करतो. पण खरी आंघोळ करायला मात्र भिती वाटते.

      - सचिन

      Delete
    4. सुहृद,

      मस्तच कि रे. कशा सुचतात तुला अशा गमतीदार कविता? मला नाही बुवा सुचत!

      स्मितामावशी.

      Delete
  2. खरं सांगू का?
    स्वप्नात वाटू शकतं!

    मस्तच !

    ReplyDelete
  3. मस्तच की रे सुहृद!!

    ReplyDelete
  4. मस्त सुहृद.
    मोठ्या गटातली भुताची कविता आठव. "तिरितिर तिरंग, भिरभिर भिरंग...." त्याच्यतल भूत कस धूम पळून जातं ते.

    ReplyDelete
  5. सुहृद, मस्त! पण मला भीती वाटली ना रे!

    ReplyDelete
  6. http://allaboutfrogs.org/froglnd.shtml
    प्रिय सुह्रुद,
    तुझी कविता वाचली.मला ती खूप आवडली.भूत प्रत्यक्षात नसतं,ते स्वप्नात असू शकतं हे तू लिहिलंस ना ते मला आवडलं.त्यामुळे मला पण आता भूताची भिती वाटणार नाही.तू इतकी छान कविता लिहिल्याबद्दल बक्षीस म्हणून तुला एक बेडकांची माहिती व खेळ असलेली साईट पाठवत आहे.ती तू कोणाला तरी(आई,बाबा किंवा मुक्ता) सांगून बघ.आवडली का ते फोन करून कळवशील का?
    आत्या

    ReplyDelete
  7. :)
    टेडी बेअर ला अस स्वप्न पण पडू शकते का??

    ReplyDelete