Saturday, October 8, 2011

मी - आम्ही

मी जन्मले तेव्हा मी म्हणजे फक्त ’मी’ होते. माझ्यावर ना कोणाचा प्रभाव होता ना जबरदस्ती, ही ’मी’ तेव्हा मनमानी करायची, रडायची, हट्ट करायची. मग ही ’मी’ मोठी झाली. ती ’आम्ही’ या गटात गेली. आम्ही - आमचं कुटूंब, आम्ही विद्यार्थी, आम्ही पुणेकर इ. या ’मी’ ला हे "आम्हीपण" आवडू लागलं. ती प्रत्येक ’आम्ही’ चा एक भाग झाली. मी ’आम्ही’ त मिसळून गेली. "मी" ला ’मी" साठी वेळ पुरेनासा झाला. तिचे सगळे "आम्ही’ म्हणजे मित्र-मैत्रिणी, वर्गमित्र, कुटूंब, यात ती गुंतून गेली. आज याच्यासाठी हे उद्या त्याच्यासाठी ते, असं चालू झालं. "मी" ’मी’ ला विसरूनच गेली. ’सगळ्या आम्ही’त मीच काहीतरी वेगळं केलं तर माझ्या प्रतिमेचं काय होईल? "मी" नं प्रतिमेला जपलं पण "मी"पण जपायला विसरली.
खूप दिवस गेले "मी" मोठी झाली, तिचा "आम्ही " परिवारही मोठा झाला, वाढला. आणि एकदिवस जेव्हा "मी" नं मागे वळून पाहिलं तेव्हा ती हळहळली. ’मी’ ने मान मिळवला पण स्वतःची आवडविसरली. नवी ’मी’, आधीची ’मी’ राहिलीच नाही. ’सगळ्यांचं असच होतं का?’ मी ला प्रश्न पडला. सगळ्या "आम्ही" त स्वतःच्या "मी" लाही वेळ द्यायला हवा हे तिला जाणवलं.
’मी’ असतो तेव्हा ’आम्ही’ असावसं वाटतं आणि जेव्हा ’आम्ही’ असतो तेव्हा काहितरी ’मी’चं असावसं वाटतं.
’मी’ मग मनाशी विचार करू लागली, आणि लहानपणीच्या ’मी’ शी तिची गट्टीच जमली. ’मी’ला ’मी’चच नवल वाटलं. काय जादू केली असावी या ’आम्ही’ने?
प्रत्येकजणच या ’मी’ आणि ’आम्ही’मधे गुंतत जातो. ज्यांना ’मी’ची आस वाटते आणि आम्ही ची शक्ती समजते, त्यांनाच तर म्हणतात......
" ’मी’पण त्यांना कळले हो........"

[ ना.शा.संगतीच्या तासाला लिहिलेला लेख. ]


- मुक्ता

9 comments:

  1. व्वा, मुक्ता! आता मात्र खरोखर तुझी सही घ्यायची वेळ आली आहे. खूप छान लिहीले आहेस.

    पण मला तू लिहीलं आहेस त्यापेक्षा थोडं वेगळं वाटतं, बरं का! मला वाटतं की आपण लहान असतो तेव्हा आपल्यावर ’आम्ही’ चा पगडा जास्त असतो; म्हणजे कुटूंबातील व्यक्ती जसं करतील तसंच करायचं वगैरे. मग जसं जसं आपण मोठ्ठे होतो तसं आपण आपला स्वतंत्र विचार करायला लागतो; आपलं ’मी’पण आपल्याला गवसायला लागतं! आणि ते जपलं आणि फुलवलं पाहिजेच प्रत्येकाने. ’आम्ही’ला जपत ’मी’ ला फुलवता आलं तर बहारच आहे!

    - सचिन

    ReplyDelete
  2. मुक्‍ता,
    खूप्पच छान!!

    ReplyDelete
  3. मुक्ता संगतीचा तास पण आठवला आणि त्या तासाला तुझे लकाकणारे डोळे ही आठवले...किती अप्रतीम लिहिले आहेस...तू जे म्हणतेस ते अगदीच खरे आहे.आपण प्रत्येक जण समुहात रहात असलो तरी, स्वतअचे कहितरी आपल्या कडे असतेच व ते जपायचा प्तयत्न पण आपण करत असतो. पण ते इतके सोपे ही नसते..मागे वळुन पाहताना नेहमीच वाटते..की आपण किती बद्ललो! तुझ्या लेखातून ते शब्दात पकडण्याचा खुप छान प्रयत्न केला आहेस..

    ReplyDelete
  4. मुक्ता संगतीचा तास पण आठवला आणि त्या तासाला तुझे लकाकणारे डोळे ही आठवले...किती अप्रतीम लिहिले आहेस...तू जे म्हणतेस ते अगदीच खरे आहे.आपण प्रत्येक जण समुहात रहात असलो तरी, स्वतअचे कहितरी आपल्या कडे असतेच व ते जपायचा प्तयत्न पण आपण करत असतो. पण ते इतके सोपे ही नसते..मागे वळुन पाहताना नेहमीच वाटते..की आपण किती बद्ललो! तुझ्या लेखातून ते शब्दात पकडण्याचा खुप छान प्रयत्न केला आहेस..

    ReplyDelete
  5. मुक्ता फारच छान.

    ReplyDelete
  6. आम्ही सर्वांनी हे वाचले.प्रत्येकातल्या मी ला आणि मिळून आम्हींना फारच आवडले.त्या सर्व मी आणि आम्हींकडून मी-आम्ही बद्दल
    आम्हाला आणि आमच्यातल्या मी लाही विचार करायला लावल्याबद्दल आणि असे मस्त वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद!
    --मी(आत्या)
    आम्ही(आजोबा,आजी,आत्या)

    ReplyDelete
  7. छान ! तुझ्यातली ’मी’ तुला सापडायला लागलीय..या अर्थाने तुझे ’मी’पण कधीच गळू देऊ नकोस.

    ReplyDelete
  8. >>ज्यांना ’मी’ची आस वाटते आणि आम्ही ची शक्ती समजते.
    आवडलं.
    कधी कधी "आम्ही" च्या शक्तीला झुगारून "मी" सांभाळावी लागते.
    ते तुला जमो.

    ReplyDelete