Tuesday, April 19, 2011

अक्षरनंदन शाळा

अक्षरनंदन म्हणजे एक आगळी वेगळी शाळा.
या शाळेचा आता मला लागला लळा.

खूप नाही चकचकीत,
पण चकचकीतपणाला बाजूला सारणारा
आपलेपणा आहे तिच्यात !
खूप नाहीत रीतीरिवाज
पण त्यापेक्षाही इतरांबद्दल
भरपूर आदर आहे तिच्यात !

वह्या भरत नाही इथे कोणी,
अनुभवातून शिकतात सारे
चाकोरीबद्‍ध शिक्षण नसते,
मुक्तपणा असतो त्याच्यात !

गणवेशाची सक्‍ती नसते,
अभ्यासावर भक्‍ती असते !
हुशार होतकरु नागरिक घडवते
ही आगळी-वेगळी शाळा !

गुणांचे बंधन नसते,
दोस्तांचीही संगत असते
निर्मळ आनंद खळखळणारे, भरभरून देते ,
हि आगळी वेगळी शाळा!

ताई भरपूर ज्ञान देतात,
निसर्गाची महती गातात !
मुलांचे बालपण हरवणार नाही
याची काळजी घेते ही आगळीवेगळी शाळा !

कधी वाटते, दहावीनंतर कसे असेल जगणे माझे,
शाळा नाहीत, दोस्त नाहीत, फक्‍त अभ्यासाचे साचे !
शाळा सोडण्याच्या कल्पनेनेच, डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हे प्रेम, वात्सल्य, कधी मिळेल का परत आयुष्यात ?
काहीतरी दूर होतंय याची जाणीव होते आहे
म्हणून मन मोकळं होण्यासाठी, आता कविता लिहिते आहे.


(सहावीचे वर्ष संपतानाची कविता)

8 comments:

  1. खूपच छान. पण अजून ४ वर्षं आहेत. इतक्यात काळजी नको.

    ReplyDelete
  2. मस्त!

    ”कधी वाटते, दहावीनंतर कसे असेल जगणे माझे,
    शाळा नाहीत, दोस्त नाहीत, फक्‍त अभ्यासाचे साचे !”

    असंच असायला हवं असं नाही काही!

    ReplyDelete
  3. मस्त! शाळा पण आणि शाळेवरची कविता पण! मोठेपणी सुध्दा तेव्हाच्या तुला आवडतील अशा संस्थांमध्ये शिकायची / काम करायची संधी तुला मिळो हीच सदिच्छा!

    ReplyDelete
  4. मुक्ता, तुझी भावना या कवितेतून छान व्यक्त होतेय.पण एक सांगावेसे वाटतेय..भरपूर कविता वाचत जा,त्यातून तुझी कविता अजून नवीन वाटा शोधेल,यमक सोडून बाहेर येइल.
    शाळेतली प्रत्येक गोष्ट तू मनापासून,आनंदाने करत आहेस,ते पाहताना ताई म्हणून मला खूप छान वाटते.मस्त

    ReplyDelete
  5. अशी जर अमुची शाळा असती,
    आम्हीही कवि झालो असतो..

    ReplyDelete
  6. यावरून तुझं शाळेवर खूप प्रेम आहे हे सिद्ध होतं

    ReplyDelete
  7. ही कविता बालमित्रत टाक.आपली शाला खूप प्रसिध होईल.
    कारण कविता खूप्च मस्त आहे.

    -नीरजा

    ReplyDelete