Friday, April 15, 2011

आत्याला सोडवायला दिलेला पेपर......

हॅरी पॉटर मंडळातर्फे....

हॅरी पॉटर शिष्यवृत्ती
प्रश्नपत्रिका

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्र.१ गाळलेल्या जागा भरा. वाक्य उतरवून घ्या.

1. हॅरी पॉटर आणि ----- हा ४था भाग आहे.
2.हॅरीचे संपूर्ण नाव "------ ------ ------" असे आहे.
3.हॅरीचा जन्म -------- ला झाला.
4.हॅरीच्या एका वर्गमैत्रिणीचे नाव भारतीय आहे. ती म्हणजे ------- व तिच्या जुळ्या बहिणीचे नाव ------- असून
ती ------- या हाउसमधे आहे.
5.सिरियस ब्लॅक हा हॅरीचा ------- होता
6.सिरियस व रिटा दोघेही -------- होते.
7.हॅरीची जन्मतारिख -------- ही आहे. ( साल नको. )


प्र.२ ओळख द्या. साधारणतः इतिहास, कार्य या सर्व गोष्टी यायला हव्यात.

1.सिविरस स्नेप
2.व्हॉल्डेमॉर्ट
3.फायरबोल्ट

प्र.३ सविस्तर उत्तरे द्या.

1.व्हॉल्डेमॉर्टनी हॅरीला ( सातव्या भागात ) मारूनही तो कसा जिवंत झाला? कशामुळे?
सिविरस स्नेप डम्बलडोरच्या बाजूने कसा आला? कशामुळे? त्याने डम्बलडोरना कोणत्या महत्वाच्या बेताला मदत केली?

2.मृत्यूची बक्षिसे म्हणजे काय? यांच्यामुळे काय होतं?

3.हॅरीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करा.

प्र.४ जोड्या लावा.

1.हॅरी लुपिन
2.स्नेप अजेय छडी
3.डम्बलडोर शापांची माहिती
4.टोंक्स पॉटर

प्र.५ नावे लिहा-

1.हॉगवर्टसची हाऊस =
2.डर्स्ली कुटुंबातील सदस्य =
3.डम्बलडोर परिवारातील चौघांची नावे =
4.संपूर्ण विज्ली कुटुंबियांची नावे =
5.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेतलेल्या व्यक्ती =
6.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेणार्‍या शाळा =
7.व्हॉल्डेमॉर्टचे समर्थक अर्थात प्राणभक्षी =

प्र.६ फरक लिहा.

1.ड्रेको मॅल्फॉय , हॅरी पॉटर
2.जिनी विज्ली , लव्हेंडर ब्राऊन

प्र.७ हॉगवर्टसच्या किमान ६ प्रोफेसरांची नावे व त्यांचे विषय लिहा.

प्र.८ विशेषणे द्या. ( कमीत कमी १० )

1.हर्माइनी जीन ग्रेंजर =
2.स्नेप =

प्र.९ निबंध लिहा. कमीत कमी २५ ओळी.

1.क्विडिच
2.हॉगावर्टस
3.ग्रिंगॉटस

प्र. १० तुम्हाला हॉगवर्टसला शिकायची संधी मिळाल्यास काय कराल ते १५ - २० ओळीत लिहा.

प्र.११ छू मंतर गल्लीचे वर्णन करा. उदाहरणे अवश्य द्या.

प्र.१२ निदान ३ झाडूंच्या प्रकारांची नावे व योग्यता लिहा.

प्र.१३ एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.जादूई जगात अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःच आपला मालक निवडते?
2.पर्सी आयर्लंड विरूध्द बल्गेरिया सामन्याच्या वेळी कोणता अहवाल लिहीत होता?
3.हॅग्रिड कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे?
4.कोण फक्त ग्रिफिंडॉरची तलवार वापरू शकतो?
5.कोणत्या पक्षाची कोणती गोष्ट जखम भरू शकते?
6.सुवर्णशोधक काय काम करतात?

प्र.१४ थोडक्यात उत्तरे लिही.

1.व्हॉल्डेमॉर्ट चे नाव त्याने व्हॉल्डेमॉर्ट असे का ठेवले?
2.मायासुवर्ण म्हणजे काय?


प्र.१५ भरपूर माहिती लिहून स्पष्ट करा...

1.व्हॉल्डेमॉर्टचा पुनर्जन्म
2.हॅरीने घेतलेला होरक्रक्सचा शोध
3.स्नेपचा हॅरीबद्दलचा हेतू

1.जेके रोलिंगला कथा कशी सुचली? कशामुळे?
2.हॅरी पॉटरचा विक्रमी खप
3.जेकेच्या रहाणीमानात पडलेला फरक


प्र.१६ विचार करून सोडव.

हॅरीच्या मित्राचा पाळीव मित्र , त्याचा शत्रू, त्याची मोठी मैत्रिण , तिचा पाळिव मित्र , त्याचा नवीन मोठा कैदी मित्र , त्याचा मित्र , त्याचा मुलगा , त्याची पाळिव मैत्रिण ,
तिचा खुनी , त्याचा शुध्द रक्ताचा- गुलाम बाळगणारा मित्र , त्याची मैत्रिण , तिची शत्रू , तिचा आवडता (माजी) शिक्षक.........

कोण??



----------------------------------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------------------------------------------

8 comments:

  1. आगं बाबौ!
    असला पेपर सोडवायला हॅरी पॉटरची किती पारायणे करायची असतात?
    तुझ्या भावाच्या आईच्या मुलीच्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या भावाच्या बहिणीने काय प्रतिक्रिया दिली?

    ReplyDelete
  2. हा तर अंतर्राष्ट्रीय पातळीचा पेपर आहे. त्याच्या संबंधी आम्हाला मार्गदर्शन कुठे मिळेल. (म्हणजे काही शिकवणी वगैरे आहे का ? कारण नुसती पुस्तके वाचून आम्हाला हे क्लिष्ट प्रश्न कळणार नाहीत)

    ReplyDelete
  3. बाप रे, एवढा पेपर वाचून थकले मी. जे.के. रोलिंगला तरी एवढे सगळे आठवले असते का?
    - गौतमी

    ReplyDelete
  4. सूचना: वरील प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाठ्यपुस्तके कुमार परिसर येथे आनंदाने व उत्साहाने उपलब्ध करून दिली जातात.

    ReplyDelete
  5. पुस्तकांसाठी तर मी आजच नोंदणी करते. पण हा पेपर बघून असे वाटते आहे की नुसती पुस्तके वाचून भागणार नाही, ‘मुक्ता’ कोचिंग क्लासेस पण लावावे लागणार!

    ReplyDelete
  6. शिष्यवृत्ती काय आहे? ते कळलंच नाही.
    त्याशिवाय कसा पेपर सोडवणार??

    ReplyDelete
  7. तुझ्या आईच्या छोट्या भाच्याच्या आईच्या वडिलांच्या मोठ्या नातवाला पेपर फार आवडला

    ReplyDelete