Saturday, May 15, 2010

शाळेची घंटा

आमची शाळेची घंटा आहे दुसर्‍या मजल्यावर
ती वाजली उशीरा येणारे कापती थरथर
तिचा स्वर आहे मंजूळ व सुस्वर
पण कधी इतका भयाण की वाटे जोडावे कर
शाळा सुटल्याची घंटा वाजली की सारे पळतात
मौनाची घंटा वाजली की चुपचाप बसतात
थोडक्यात म्हणजे आम्ही पाळतो तिची आज्ञा
शोभाताई म्हणतात घंटा ही आहे संज्ञा

आमची घंटा आहे लटपटी नार
आम्हाला ती आवडते फार!

1 comment:

  1. वा!हिंदीतील संज्ञा आणि आज्ञा छान जुळवले आहेस.
    -गौतमी

    ReplyDelete