Wednesday, August 25, 2010

सुहृदच्या कविता



तापा तापा येऊ नकोस
मला भीती दाखवू नकोस
मला असा गार ठेव
माझ्या भानगडीत पडू नकोस
लाs लाs लाs
लंल लंल लाs
-----------




एक होता माणूस
त्याने खाल्ला चिवडा
सरपटत सरपटत येणारी
चकली खाल्ली
मधेच गाल फुगवणारा
लाडू खाल्ला
करंजी, काजूकतली, बाकरवडी
सगळं त्याने खाऊन टाकलं.
हैशा हुईशा हैशा
माणसाचं पोट भरलं
केवढं मोठ्ठं झालं!
पुन्हा पुन्हा फुगायला लागलं,
दुखायला लागलं.
पलंग शोधून
नीट झोपी गेला
हाताची उशी करून
नीट झोपी गेला
अशा कुठल्याही गोष्टी
खायच्या नाहीत, माणसा
लं लं लाs लै लै लाs
आई त्याची रागावली
लं लं लाs लै लै लाs
-----------



फुगे चालले गावाला
फुगे चालले गावाला
एक फुगा मडमडणारा
त्याची दोरी एवढी लांब
त्याच्या मागे ओळ झाली
सोळा सतरा फुगे चालले
लं लं लाs लै लै लाs
हा आठ मी सात
हा सहा मी पाच
हा चार मी तीन
हा दोन मी एक
हा शून्य, हा शून्य, हा शून्य
मी शून्य, मी शून्य, मी शून्य
----------


बदकराव बदकराव

खाता काय, कसे राव?

दात घासून या राव

चूळा भरा, भाव भाव


----------


मांजर मांजर भाटीबाई

उंदराला खाते पटा पटा

कुत्रा कुत्रा

मांजरीला खातो

कुत्र्याला खातो वाघ

मटा मटा
-----------

7 comments:

  1. कविता मस्त आहेत.लम्पूला सांग.मुक्तांगण आता सुह्रुदांगणही झाले तर!

    ReplyDelete
  2. लाs लाs लाs
    लंल लंल लाs
    आणि
    हैशा हुईशा हैशा
    हे भारी आहे!!
    सगळ्याच कविता खूप गोड. आता त्याचा वेगळा ब्लॉग सुरु कर!
    चित्रं मस्त!

    ReplyDelete
  3. वा! सुहृद भारी आहे एकदम! मला सर्वात आवडलेल्या ओळी:
    हा शून्य, हा शून्य, हा शून्य
    मी शून्य, मी शून्य, मी शून्य !
    आणि "ला ला ला लं लं ला" खूप आवडतं वाटतं साहेबांना! तो म्हणत असेल तेव्हा जरूर रेकॉर्डिंग कर. बघायला मजा येइल.

    - सचिन

    ReplyDelete
  4. सुहृदच्या कविता खूपच छान
    वाचताना आमचे हरपले भान!!

    सुहृदच्या कविता मस्तच फ़ार
    त्याच्यासाठी मोठ्ठा स्टार :)

    ReplyDelete
  5. सुहृद मस्तच.
    मुक्ता कविता सचित्र केल्याने अजून मजा येत आहे. ला..ला...ला..

    वैशाली

    ReplyDelete
  6. ताईच्या पावलावर पाऊल वाटतं!
    बाकी या सर्व Commentsशी सहमत. :)

    ReplyDelete
  7. लंपन या कविता खुपच मस्त झाल्या आहेत. लवकरच तुही ब्लॉग काढ्शील त्यासाठी खुप खुप शुभेच्छा !!! :)

    ReplyDelete