Saturday, January 16, 2010

श्रुतलेखन असंच करतात ना?

आज वर्गात ताई २४ ताशी घडयाळाबद्दल बोलत होत्या. नंतर आम्हाला त्यांनी श्रुतलेखन घातलं आणि यातून ताईंनापण लिहायचा कंटाळा येतो हे सुरुवातीलाच समजले. ताई श्रुतलेखन बघत-बघत माझ्यापर्यंत आल्या, मी त्यांना वही दिली. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले आणि ३ सेकंदानंतर मी वर्गाबाहेर होते.

मी तर सगळं व्यवस्थित लिहिलं होतं!
तुम्हीच बघा!


२४ ताशी घडयाळ
काही ठिकाणी कंस रेल्वे ऑब्लिक विमान वेळ कंस पूर्ण बारा-बारा, बारा-बारा दोनदा लिहा. तासांच्या ऐवजी चोवीस नीहार गप्प बस ताशी दिवस मानला जातो पूर्णविराम आता खालच्या ओळीवर लिहा रात्रीचा एक ते दुपारचे बारा एरवी प्रमाणे किंवा नेहमी प्रमाणे आता खालच्या ओळीवर लिहा दुपारचा एक म्हणजे दु. एक बरोबर तेरा विश्वभारती बोलू नकोस दु. दोन बरोबर चौदा स्वल्पविराम दु. तीन बरोबर पंधरा आता मधे डॉट डॉट दया मिहीर ते आत ठेव आणि नंतर लिहा रात्रीचे बारा बरोबर चोवीस चला वह्या मला दाखवा.


बरोबर आहे ना? आता यात काही चिडण्यासारखं होतं का? ताई जे बोलल्या तेच लिहायचं असतं ना?
श्रुतलेखन असंच करतात ना?

8 comments:

  1. मुक्ता,
    कल्पना आवडली. खरंच करून पाहिलस तर मला नाही वाटत तुमच्या शाळेत बाहेर पाठवतील असं!

    ReplyDelete
  2. पण ही काल्पनीक कथा (व्यथा) आहे. मी जगातल्या सगळया मुलांचा प्रश्न विनोदी पध्दतीने मांडला आहे.
    मुक्ता

    ReplyDelete
  3. मुक्‍ता
    तू आजवर जे काही लिहिलयस (कविता सोडून) त्यात श्रुतलेखन सर्वोत्तम... :)

    मोहिनीआत्या

    ReplyDelete
  4. मुक्ता तुझी विनोदीशैली मला खूपच आवडली. तुझी ही काल्पनिक कथाच आहे ना ? मला थोडी शंकाच येते.

    म्हणींचा वापर भारी केला आहेस. हसून हसून पुरेवाट झाली.

    - वैशाली

    ReplyDelete
  5. ख्या... ख्या... ख्या... खूप छान.

    ReplyDelete
  6. Shrutalekhan mhanje dictation naa ga?

    ReplyDelete
  7. खरंच,माझा पण हाच प्रश्न आहे.जो तू मांडला आहेस.

    ReplyDelete